पायाभुत सोयी-सुविधांची निर्मिती व विकास योजने अंतर्गत माळेगाव ते मुसळगाव व अंतर्गत पाईप लाईन कामांचा भुमिपूजन समारंभ

पायाभुत सोयी-सुविधांची निर्मिती व विकास योजने अंतर्गत माळेगाव ते मुसळगाव व अंतर्गत पाईप लाईन कामांचा भुमिपूजन समारंभ

चेअरमन
17 Jan 2024
about

महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ मधील तरतुदीनुसार पायाभुत सोयी सुविधांची निर्मिती व विकास योजने अंतर्गत

1. माळेगाव ते मुसळगाव औद्योगिक वसाहत पर्यंत १० कि.मी. लांबीची २५० मी.मी. व्यासाची नविन Duct Iron ची पाईप लाईन व,

2. संस्थेच्या ले-आऊटप्रमाणे १७ कि.मी. लांबीची नविन Duct Iron ची अंतर्गत पाईप लाईन कामांचा

भुमिपूजन समारंभ बुधवार, दि.१७/०१/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेचे "उद्योगभवन" कार्यालया जवळ नाशिक जिल्ह्याचे खासदार मा.श्री.हेमंत (आप्पा) गोडसे, श्री.शिवनिका संस्थान, मिरगावचे अध्यक्ष, मा.कॅप्टन श्री.अशोककुमार खरात, युवानेत मा.श्री.उदय सांगळे, MIDC चे अधिक्षक अभियंता मा.श्री.बाळासाहेब झंजे हे प्रमुख पाहुणे, तसेच स्टाईस संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य व उद्योजक सभासदांच्या उपस्थितीत विधीवत पुजनासह श्रीफळ वाढवुन कुदळी मारून करण्यात आला.