सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस) ता.सिन्नर जि. नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम- १९६१ अंतर्गत नोंदणीकृत संस्था असुन तिचा नोंदणी क्रमांक- NSK/RSR/१०२४. दि.१०/१२/१९८२ आहे. या संस्थेचे वर्गीकरण साधन संस्था असुन उपवर्गीकरण सेवा साधन संस्था असे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा ठराव क्र. IEC -१०८२/३३२७५/(२३१८)- IND-१८. दि.१८/०१/१९८३ मंत्रालय, मुंबई - ३२ अन्वये सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस ) ता.सिन्नर जि.नाशिक ही संस्था स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस) ता. सिन्नर जि.नाशिक या संस्थेने मौजे मुसळगाव ता. सिन्नर या महसुली शिवारात व ग्रामपंचायत हद्दीत गट नं. ९१४ ते ९४६, ९४८ व ९७१ क्षेत्रफळ १६२.०१ हेक्टर (४१० एकर) या जमिनीवर औद्योगिक वापराचा अभिन्यास टाकुन त्यास नगररचना विभागाची मंजुरी घेतलेली असुन महसुल विभागाकडुन हे सर्व क्षेत्र औद्योगिक वापरासाठी बिनशेती करून घेतलेले आहे.