संस्थेबाबत थोडेसे

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. सिन्नर

10 डिसेंबर 1982 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यातील 124 सहकारी औद्योगिक वसाहतींमध्ये आम्ही सर्वात मोठ्या सहकारी औद्योगिक वसाहतीपैकी एक आहोत ज्याचे एकूण क्षेत्रफळ 410 एकर आहे.

आम्ही, STICE मध्ये, दुष्काळग्रस्त तालुक्याचा विकास करून सर्वोत्कृष्ट औद्योगिक पायाभूत सुविधांपैकी एक बनवून व समतोल आर्थिक विकासासाठी योग्य धोरणे तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

STICE
STICE
STICE

संस्थेने साध्य केलेले उद्दिष्टये

आम्हाला परिभाषित करणार्‍या काही प्रमुख विशेषता गुणधर्म पहा

४.३० लाख + संस्थेचे वसूल भाग भांडवल

आमची आर्थिक ताकद आणि स्थिरता अधोरेखित करून STICE कडे ४.३० लाखांचे भाग भांडवल जमा आहे.

३९५+ सदस्य

आम्हाला आमच्या ३९५ समर्पित सभासद समुदायाचा अभिमान वाटतो. आमच्या व्यक्तींचे वैविध्यपूर्ण नेटवर्क ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टीकोनांची संपत्ती एकत्र आणते.

५७२ + भूखंड

STICE संस्थेकडे तिच्या स्वः मालकीची ४१० एकर जमीन असल्याचा खुप अभिमान आहे, ज्यामध्ये ५०० चौ.मी. पासुन ते १० एकर पर्यंत एकुण ५७२ भुखंड आहेत. या भुखंडावर आमचे सभासद त्यांच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांची उभारणी करतात.

३८५ + उद्योगांचे उत्पादन सुरू

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रात एकुण ३८५ उद्योगांचे प्रत्यक्षात उत्पादन सुरू आहे. हे ३८५ उद्योगांचे विस्तृत उत्पादन हे आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

२५,५०० + रोजगार उपलब्धता

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रात २५,५०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याने तब्बल २५,५०० कुटुंबांना स्टाईस संस्थेच्या माध्यमातुन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

१३०० कोटी + गुंतवणूक

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रात १३०० कोटींची गुंतवणूक झाली असुन जी आमची विकासाची वचनबद्धता दर्शवते. हे महत्त्वपूर्ण भांडवल ओतणे आम्हाला आमच्या कार्याचा विस्तार करण्यास सक्षम करते.

१३५०० कोटी + वार्षिक उलाढाल

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ३८५ उद्योगांची वार्षिक उलाढाल १३५०० कोटी+ रक्कमेची आहे. ही बाब आमच्या संस्थेच्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करते.

२५०० कोटी + G.S.T. भरणा

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ३८५ उद्योग प्रतिवर्षी साधारणपणे २५०० कोटी इतक्या रक्कमेचा GST भरणा करते. ही बाब संस्थेच्या माध्यमातुन शासनास महसुल मिळवुन देण्याची बाब दर्शविते.

१०५० कोटी + आयकर भरणा

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ३८५ उद्योग प्रतिवर्षी साधारणपणे १०५० कोटी इतक्या रक्कमेचा आयकर भरणा करते. ही बाब संस्थेच्या माध्यमातुन शासनास महसुल मिळवून देण्याची बाब दर्शविते.

२८ + उद्योगांची निर्यात

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ३८५ उद्योगांपैकी २८+ उद्योग बाहेरील देशात निर्यात करतात. ही बाब संस्थेच्या माध्यमातुन जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची बाब दर्शविते.

८५० कोटी + निर्यात

STICE संस्थेच्या कार्यक्षेत्रातील २८ + उद्योग प्रतिवर्षी ८५० कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे आपले उत्पादन बाहेरील देशात निर्यात करते. ही बाब निर्यातीच्या माध्यमातुन शासनास महसुल मिळवुन देण्याची बाब दर्शविते.

सतत ४१ वर्ष A ऑडिट ग्रेड

पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी आमची बांधिलकी अधोरेखित करून, STICE संस्थेने अभिमानाने ४१ वर्षांपासून सतत A ऑडिटर ग्रेड धारण केले आहे. हा ग्रेड आर्थिक व्यवहारांचा पुरावा आहे.

संस्थेने तयार केलेल्या पायाभूत सुविधा

संस्थेने तयार केलेल्या पायाभूत सुविधा ज्या आम्ही आमच्या ग्राहकांना प्रदान केलेल्या आहे.

stice
दळणवळण

१७ कि.मी. लांबीचे डांबरी रस्ते उपलब्ध

stice
पाणीपुरवठा

२२५० घ.मी. प्रतिदिनी पाणी साठवण्यासाठी ३ जलकुंभ उपलब्ध

stice
वीजपुरवठा

उद्योजकांच्या वीज मागणी पुर्ततेसाठी ३० MVA क्षमतेचे एक व १० MVA क्षमतेचे एक असे दोन स्वतंत्र ३३/११ KV सबस्टेशन उपलब्ध

stice
कचरा व्यवस्थापण

घनकचरा व्यवस्थापनासाठी संस्थेची स्व:मालकीची घंटागाडी उपलब्ध

stice
अग्निशमन दल

संस्थेची स्वमालकीची अग्निशमन व्यवस्था उपलब्ध

stice
दिशादर्शक बोर्ड

पत्ता शोधणे सुलभ होणेसाठी प्रत्येक रस्ता चौफुलीवरील दिशादर्शक बोर्डे उपलब्ध

stice
महा ई-सेवा केंद्र

उद्योजकांच्या सेवेसाठी संस्था कार्यालयातील महा ई-सेवा केंद्र सुविधा उपलब्ध

stice
स्वतंत्र पोलिस स्टेशन

संस्था परिसरातील स्वतंत्र पोलिस स्टेशन उपलब्ध

stice
स्वतंत्र पोस्ट ऑफिस

संस्था परिसरातील स्वतंत्र पोस्ट ऑफिस उपलब्ध

stice
टेलिफोन एक्सचेंज

संस्था परिसरातील स्वतंत्र १००० लाईनचे टेलि फोन एक्सचेंज उपलब्ध

stice
ATM सुविधा

संस्था परिसरात ३ बँका ATM सुविधांसह कार्यरत

संस्था पदाधिकारी

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. सिन्नर (स्टाईस) ही एक सहकारी औद्योगिक वसाहत संस्था आहे की, जी सिन्नर (नाशिक) महाराष्ट्र येथे स्थापन झालेली असुन ही सहकारी औद्योगिक वसाहत संचालक मंडळाद्वारे चालविली जाते. की जे संचालक मंडळ संस्थेच्या सभासदांमधुन दर पाच वर्षाने निवडले जाते.

STICE

श्री. आवारे नामकर्ण

चेअरमन
member image

श्री. कुंदे सुनिल

व्हा. चेअरमन
sandip Tarle

श्री. संदीप टर्ले

व्यवस्थापक