सन्माननीय धर्मयोध्दा सुदर्शन न्युज चॅनल, नोएडा, नवी दिल्लीचे संचालक व सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गांवचे भुमिपूत्र श्री.सुरेशजी चव्हाणके साहेब यांनी गुरूवार, दि.03/07/2025 रोजी स्टाईस संस्थेस सदिच्छा भेट दिली. त्या भेटी समयी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच केंद्र शासनाकडे प्रलंबीत दोन कामांबाबत संस्थेचे सन्माननीय चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांनी चर्चा करून माहिती दिली. त्यासमयी संस्थेचे संचालक श्री.रामदास डापसे, श्री.संदिप पगारे, तज्ञ संचालक श्री.सुनिल जोंधळे व स्विकृत संचालक श्री.विठ्ठल जपे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.