माननीय चेअरमन यांचे मनोगत

aware yashwant
श्री. आवारे नामकर्ण

माननीय चेअरमन

प्रिय उद्योजक मित्रहो,

सप्रेम नमस्कार,

आपला उद्योग व्यवसाय सतत वृध्दींगत होण्याच्या शुभेच्छांसह . . .

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस) या संस्थेचा सर्वांगीण औद्योगिक विकास, सभासदांचे हित व दुष्काळग्रस्त सिन्नर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा उद्देश समोर ठेवून आम्ही विद्यमान संचालक मंडळाने दि. २७/७/२०२२ रोजी संस्थेचा पदभार स्विकारला व झपाटल्यागत काम सुरू केले, कामकाज सुरू करतानाच ठरविले की, आपली संस्था जरी एक सहकारी संस्था असली तरी ही संस्था ३९४ उद्योजक सभासदांची सहकारी औद्योगिक वसाहत संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या कार्यक्षेत्रात उद्योजक सभासदांना सतत गुणवत्तेच्या व उच्च दर्जाच्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करून आम्ही विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळ कामाला लागलो आहे.

संस्थेच्या निवडणुकीनंतर सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष काम करतांना संस्थेच्या कार्यक्षेत्रात ८५ दिशादर्शक बोर्ड रस्त्याच्या चौका-चौकात लावले, सभासद संस्थांचे भागीदार व संचालक बदलासाठी विशेष अभय योजना मंजुर करुन ती लागु केली, संस्थेची स्वतःची अग्निशमन व्यवस्था सुरू केली, संस्थेच्या आर्थिक बचतीसाठी घंटागाडी करीता नविन ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केली, संस्थेमधील वर्षानुवर्ष बंद असलेले उद्योग पुर्ववत सुरू करण्यासाठी कामकाज सुरू केल्याने गेल्या दोन आर्थिक वर्षात प्रत्यक्षात ४७ उद्योग सुरू झाले आहे, शासकीय योजनेतुन "बी" रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण केले, संस्थेसाठी ४० वर्षानंतर घोषवाक्य तयार केले, संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात ऑनलाईन गेटवे पेमेंट सुविधा सुरू केली, PSI योजनेसाठी कोरोना कालावधीतील ०२ वर्षाच्या बंद उद्योगांचा विचार करून शासनाकडुन अनुदान कालावधी ०२ वर्षांने वाढवुन घेतला, उद्योजक व कामगारांसाठी सिन्नर-मुसळगाव बससेवा सुरू केली, कार्यालयीन कामकाजासाठी आधुनिक पद्धतीचे कपबोर्ड खरेदी केले, सभासदांच्या सहभागातून उद्योगभवन कार्यालयाचे आतुन व बाहेरून सुशोभिकरण केले, आपले सरकार महा ई-सेवा केंद्र सुरू केले, प्रत्येक महिण्याच्या पहिल्या शुक्रवारी सभासदांबरोबर ऑनलाईन झुम मिटींग घेण्यास सुरूवात केली, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ड्रेनेज व्यवस्था सुस्थितीत करण्याचे काम केले, अहवाल सालात २,२५६ वृक्ष लागवड करून पर्यावरण पुरक काम केले, सभासदांकरीता उत्तम सेवा देण्यासाठी पोर्टल व वेब-बेस सॉफ्टवेअर नवीन तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात देखील आपण उद्योजक सभासदांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कामे हाती घेऊन ती कामे पुर्ण केली आहे. त्याचा सविस्तर अहवाल पुढे नमुद केला आहे, कृपया त्याचे अवलोकन व्हावे.

उपरोक्त कामांपैकी काही खर्चिक कामांसाठी संस्थेकडे पुरेसा स्वः निधी उपलब्ध नसतांना देखील सभासदांच्या आर्थिक सहभागातुन पहिल्या मजल्यावरील आद्य उद्योजक श्रीमान नंदलालजी केला सभागृहाचे आधुनिक पद्धतीचे सुशोभिकरण, अग्निशमन व्यवस्था, फवारणी मशिन, संस्थेची सविस्तर माहितीची चित्रफीत, संस्थेसाठी कॅमेरा खरेदी, ध्वजारोहन स्टेजचे सुशोभिकरण, गार्डनसाठी सिमेंट कर्व्ह इत्यादी कामे पुर्ण करण्यात आली, ही बाब या ठिकाणी अतिमहत्त्वाची व कौतुकास्पद आहे असे मला वाटते. ज्या दानशुर उद्योजक सभासदांनी संस्थेच्या सार्वजनिक कामासाठी अतिशय उदार मनाने निधी उपलब्ध करून दिला त्या दानशूर सभासदांचे मी संस्थेच्या व संचालक मंडळाचे वतीने हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजात यापुढे देखील असेच आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करतो.

झाडे लावा... झाडे जगवा... पर्यावरण वाचवा...

PLANT TREES... SAVE TREES.... SAVE THE ENVIRONMENT......

सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा