संस्थेने स्वतःची अग्निशमन व्यवस्था तयार केली. ती सभासदांच्या सेवेत अर्पण करतांना देणगीदार सभासद श्री. रमेश कानडे, उद्योजक श्री. प्रविण गद्रे, संस्थेचे चेअरमन श्री. आवारे नामकर्ण, व्हा. चेअरमन श्री. कुंदे सुनिल,
संस्थेच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावर गल्ली क्रमांक व प्लॉट क्रमांक दर्शविणारे बोर्ड लावण्यात आले.
संस्थेची स्वः मालकीची घंटागाडी चालू केली.
वीज वितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी व उद्योजक सभासदांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन
उद्योगभवन कार्यालयाच्या आवारात महा ई-सेवा केंद्र सुरु केले.
स्टाईस संस्थेकरीता CSR निधीचा चेक संस्थेचे चेअरमन सुपूर्त करतांना
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रात झाडे लावतांना संस्थेचे पदाधिकारी व कंपनीचे कर्मचारी सहकुटुंब.
लोणावळा सहकारी औद्योगिक वसाहतींचे चेअरमन व संचालक मंडळाचा स्टाईस संस्थेच्या कार्यक्षेत्रात अभ्यासदौरा प्रसंगी संस्थेच्या वतीने सत्कार करतांना.
अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक सभासदांना मार्गदर्शन करतांना
भा.ज.पा. उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पदी स्टाईसचे चेअरमन मा.श्री.नामकर्ण आवारे यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल संस्थेचे उद्योजक सभासद यांचे वतीने चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
राज्यातील 124 सहकारी औद्योगिक वसाहतींच्या समस्यांबाबत तज्ञ गटाची मा.विकास आयुक्त (उद्योग) यांनी दि.२८/११/२०२३ रोजी मुंबई येथे त्यांचे दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संस्थेचे चेअरमन श्री.नामकर्ण आवारे यांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकारी औद्योगिक वसाहतींना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
दैनिक लोकमत, नाशिक कार्यालयाने नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील काही संस्थांची निवड केली असुन त्यामध्ये आपल्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या., सिन्नर (स्टाईस ) या संस्थेस Brand of Nashik हा पुरस्कार मिळाला.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना (CMEGP)
पायाभुत सोयी-सुविधांची निर्मिती व विकास योजने अंतर्गत माळेगाव ते मुसळगाव व अंतर्गत पाईप लाईन कामांचा भुमिपूजन समारंभ
परिसंवादाचे आयोजन
अग्निशमन व्यवस्था व औद्योगिक सुरक्षा बाबत बैठकीचे आयोजन
रूग्णालय सुविधासाठी निवेदन
MSME उद्योग घटकांसाठी आयकर कलम-43B(h) या कलमावर चर्चासत्राचे आयोजन
॥ अंबिका वन प्रकल्पाचा महावृक्षारोपण सोहळा ॥