सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतांना आपल्या देशाच्या अर्थमंत्री मा.ना.निर्मला सितारामन यांनी आयकर कलम-43B(h) हे नवीन बील MSME उद्योग घटकांसाठी सादर केले आहे. त्याकरीता कलम-43B(h) मधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती होण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात मेसर्स-आर.जाजु & असोसिएट्स, नाशिक श्री.रोशन जाजु यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.